नोबेल शांती पुरस्कार विजेती मलालाने ‘द ऑक्सफर्ड यूनियन’च्या दरम्यान अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाची भेट घेतली. त्यावेळी मलालाने सांगितलं की, मी पॅडमॅन सिनेमा पाहण्यासाठी फार उत्सुक आहे. सिनेमातील संदेश अत्यंत प्रेरणादायी आहे. यासोबतच मलालाने पॅडमॅनच्या टीमसोबत फोटोही काढला. या फोटोत हे सर्वजण हातात पॅड घेऊन उभे आहेत.मात्र मलालाने काढलेला हा फोटो पाकिस्तानच्या सोशल मीडिया युजर्सना आवडला नाही. त्यांनी मलालाला हिंदुस्थानी सिनेमाचं प्रमोशन केल्याने आणि हातात पॅड पकडून फोटो काढल्याने तिच्यावर टीका केली आहे. तर काहींनी मलालाचं समर्थनही केलं. एका युजरने कमेंट केली की, मलालाचं हातात पॅड पकडनं काही तालिबानी लोकांना हातात बंदूक पकडून तिच्या डोक्यात गोळी मारण्या पेक्षाही भयंकर वाटत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews